OMG! लग्नाच्या दिवशी वर आलाच नाही, म्हणून या अनोख्या पद्धतीने केला विवाह!

'द सन'च्या वृत्तानुसार, लग्नाच्या वेळी नवरदेवाची तब्येत बिघडली होती. त्याला अन्नातून विषबाधा झाली होती. ही घटना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील आहे.

  पण नवदेवाशिवाय लग्न कसं शक्य आहे?

  लग्नात वधू आणि वर दोघांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. पण ही बातमी वाचून तुम्ही म्हणाल की तसे नाही. लग्न नवरदेशिवाय होऊ शकते. कारण ते घडले आहे. त्याचे असे झाले की लग्नाच्या दिवशीच वराची तब्येत अचानक बिघडली, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आणि तो स्वतःच्या लग्नाला येऊ शकला नाही.

  पण नवरीनं उरकून घेतलं लग्न

  ‘द सन’च्या वृत्तानुसार, लग्नाच्या वेळी नवरदेवाची तब्येत बिघडली होती. त्याला अन्नातून विषबाधा झाली होती. ही घटना अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील आहे.

  हा जुगाड कोणी केला

  नवरदेव दवाखान्यात गेल्यावर कोणीतरी खांब उचलला आणि त्यावर कोट लटकवला. नंतर, चेहऱ्याच्या भागावर आयपॅड लावून, त्यावर नवरदेवचा फोटो लावला.

  त्यासोबत नवरीने नृत्य केले

  नवरीने त्याच प्रतिकात्मक नवरदेवासोबत नृत्य करून तिच्या लग्नाचा केकही कापला.