worlds most expensive watch

जगातल्या सगळ्यात महाग घड्याळाविषयी जॅकब अँड कंपनीने सांगितलं की, यात फॅन्सी यलो आणि फॅन्सी इंटेन्स यलो रंगाच्या 425 हिऱ्यांपासून डायल तयार करण्यात आलं आहे. आतल्या भागात 57 हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे.

जगात अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखल्या जातात. सध्या अशाच एका घड्याळाविषयी (Watch) खूप चर्चा सुरु आहे. या घडाळ्याविषयीची माहिती समजल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण आज आम्ही तुम्हाला ज्या घडाळ्याविषयी सांगणार आहोत, ते जगातलं सगळ्यात महाग घड्याळ आहे. (World’s  Most Expensive Watch) तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या घड्याळाची किंमत 2 कोटी रुपये (Watch of 2 crore Rupeees) इतकी आहे. इतक्या पैशांमध्ये माणूस बंगला आणि गाडी खरेदी करू शकतो.

हिऱ्यांनी बनलेलं घड्याळ
मिळालेल्या माहितीनुसार, हिरे जडवलेल्या या घड्याळाची निर्मिती जॅकब अँड कंपनीकडून करण्यात आली आहे. हे जगातील सगळ्यात महाग घड्याळ असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या घड्याळामध्ये 217 कॅरेटचे पिवळे हिरे आहेत जे एखाद्या बांगडीप्रमाणे कव्हर करतात.

घड्याळात काय खास ?
घड्याळाविषयी कंपनीने सांगितलं की, यात फॅन्सी यलो आणि फॅन्सी इंटेन्स यलो रंगाच्या 425 हिऱ्यांपासून डायल तयार करण्यात आलं आहे. आतल्या भागात 57 हिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. कंपनीचे सीईओ बेंजामिन अरबोव यांनी सांगितलं की, “यातल्या रत्नांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे संपूर्ण जगात यासाठी शोधाशोध करावी लागली. या घड्याळासाठीच्या जमवाजमवीसाठी साडेतीन वर्ष लागली. सगळी रत्न जिनिवा मुख्यालयात आणण्यात आली. सेटिंगच्या आधी आणि सेटिंगच्या नंतर सगळ्या हिऱ्यांची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत जे कुणी केलं नाही ते आम्ही करून दाखवलंय. आकार आणि वैशिष्ट्य याबाबतीत हे घड्याळ इतर घड्याळांपेक्षा खूप वेगळं आहे. जॅकब अँड कंपनीने याआधीही कोटींमध्ये किंमत असलेल्या घड्याळांची निर्मिती केली आहे. हिऱ्यांपासून बनवण्यात आलेलं त्यांचं एक घड्याळ बाजारात 2015 मध्ये आलं होतं. त्याची किंमत 1.8 कोटी होती. विंटेज घड्याळांमध्ये सगळ्यात पुढे आहे Graff Diamonds ने बनवलेलं Hallucination घड्याळ. यात वेगवेगळे रंग आणि कटचे 110 कॅरेट हिरे आहेत. एका प्लॅटिनम ब्रेसलेटवर हे सजवण्यात आलं आहे.