गाडीवर होळी खेळत तरुणींचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

काही तरुणींनी ही होळी अतिशय विचित्र आणि अश्लील पद्धतीने खेळत सणाला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर याची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

    संपूर्ण देशभरामध्ये काल होळीचा उत्साह दिसून आला. सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारे रंगाची उधळन करत होळी साजरी करण्यात आली. मात्र काही तरुणींनी ही होळी अतिशय विचित्र आणि अश्लील पद्धतीने खेळत सणाला कलंक लावण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर याची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्टूकर चालवत आहे. तर दोन मुली मागे होळी खेळत अश्लील वर्तन करत आहेत. व्हिडिओमध्ये दोन मुली ‘मोहे रंग लगा दे’ गाण्यावर स्कूटरवर बसून नाचताना दिसत आहेत. मुली नाचत नाचत, गाडीवर अश्लील कृत्ये करत आहेत. असे असले तरी सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत आहेत. ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.


    दरम्यान, नोएडा पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत घटनेचा तपास सुरू केला. व आरोपींना शोधून काढले. त्यांच्यावर कारवाई देखील केली. या कारवाईचे फोटो देखील नोएडा पोलिसांनी ट्वीटर या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पोस्टमध्ये नोएडा वाहतूक पोलिसांनी लिहिले आहे की, “वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 33 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे,”