तरुणीने कमी केलं २०० किलो वजन! तरुणीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहुन बसेल धक्का

    वजन वाढवणं हे काही फार मोठे कौशल्य नाही मात्र वाढलेलं वजन कमी करणं हे मोठे आव्हानात्मक आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक विविध नुस्के आजमावतात. परंतु डेडिकेशन आणि स्वतःवर नियंत्रण ठेऊ शकणारेच लोक वजन कमी करण्यास यशस्वी ठरतात. मात्र तुम्ही कधी कोणी २०० किलो वजन कमी केल्याचं ऐकलंय का? २८२ किलो वजनासह जगातील सर्वाधिक लठ्ठ व्यक्तींपैकी एक असलेल्या क्रिस्टीना फिलीप्स या तरुणीने तब्बल २०० किलो वजन कमी करत जगापुढे एक अनोखे उदाहरण ठेवले आहे.

    अगदी २० वर्षांच्या वयात क्रिस्टेनाचं वजन २८२ किलो होत. तेव्हा तिच्यावर एक सर्जरी करण्यात आली. दरम्यान डॉक्टरांनी तेला लवकरात लवकर वजन कमी करण्यास सांगितल, अथवा तिला नको ते शारिरीक आजार जडण्याची भिती आहे असं डॉक्टरांनी सांगतलं. दिवसेंदिवस क्रिस्टीनाची शारिरीक आणि मानसिक प्रकृती खालवचं होती. तिला तिच्या आई आणि पतीने दिलेल्या चुकीच्या आहार पध्दतीमुळे तिला ही ओव्हर वेटची समस्या भेडसावत होती असे क्रिस्टीनाने सांगितले. तरी डॉक्टरच्या सल्ल्यानंतर क्रिस्टीनाने वजन कमी करण्याचा निर्धार केला.

    क्रिस्टीनाने २०० किलोहून अधिक वजन कमी करत आज क्रिस्टीनाचं वजन फक्त ८३ किलो हे आणि ती या वजनात अजून घट करण्याचा प्रयत्न करत आहे. ती यांसाठी मोठी मेहनत घेत आहे. जगातिल सर्वाधिक वेट असणारी तरुणी आता सुंदर आणि निरोगी झाली आहे. डॉक्टरसह जगभरातून क्रिस्टीनाच्या जिद्दीचे मोठ कौतुक केले जात आहे.