झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा धमाकेदार डान्स व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणताऐत- आता समजलं ऑर्डर्स उशिरा का येतात

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर डिलिव्हरी बॉय डान्स करत आहे.

  सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल ( Viral Video) होत असतात. यातील अनेक व्हिडिओ लोकांसाठी धक्कादायक असतात, तर काही मजेशीर असतात. सध्या सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ खूप पाहायला मिळतात. आता एका डिलिव्हरी बॉयचा रस्त्याच्या मधोमध नाचताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसतयं की फूड डिलिव्हरी कंपनी Zomato चा डिलिव्हरी बॉय रस्त्यावर नाचत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकरीही मजेशीर कमेंट करत आहेत.

  डिलिव्हरी बॉयनेही डान्स करताना झोमॅटोचा टी-शर्ट घातला आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर डिलिव्हरी बॉय डान्स करत आहे. झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय परफेक्ट डान्सरसारखा नाचतोय.

  डिलिव्हरी बॉय मोठ्या उत्साहाने नाचत आहे. आता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @mosaan_2o नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. आता लाखो लोकांनी तो पाहिला आहे, तर जवळपास पाच लाख लोकांनी लाइक केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by MoSAaN (@mosaan_2o)

  या व्हिडिओवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, अरे पण माझ्या मिरची बटाट्याचे काय झाले? दुसरा वापरकर्ता म्हणतो की, आता त्याला समजले की ऑर्डर उशिरा का येत आहेत?