zomato delivery boy viral video

एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपल्या बायकोसोबत रस्त्याने चालत जातोय. त्याच्या सायकलचे हँडल पत्नीच्या हातात आहे. त्या डिलिव्हरी बॉयच्या खांद्यावर मुलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

    प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष सुरु असतो. मात्र या संघर्षात जेव्हा तुमच्या जोडीदाराची साथ मिळते तेव्हा आणखी हुरुप येतो. प्रत्येकाची इच्छा असते की,आपल्या आयुष्यात असा जोडीदार असावा ज्याच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो. चांगला-वाईट काळ एकत्र घालवू शकतो. पण आजकाल असं चित्र खूप कमी वेळा बघायला मिळतं. मात्र सध्या एक असाच ह्रदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे, जो अनेकांची मनं जिंकत आहे.

    व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy Video) आपल्या बायकोसोबत रस्त्याने चालत जातोय. त्याच्या सायकलचे हँडल पत्नीच्या हातात आहे. त्या डिलिव्हरी बॉयच्या खांद्यावर मुलाची जबाबदारी देण्यात आली आहे. डिलिव्हरी बॉयच्या या कुटुंबाचं अनेकांना कौतुक वाटतंय. हा व्हिडिओ पाहून जोडीदार चांगला असेल तर कठीण प्रसंगही सोपे वाटतात असं सगळे म्हणतायत. जबाबदाऱ्या पती- पत्नीने वाटून घेतल्यातर आयुष्य आनंदी होतं, असं अनेकजण म्हणतायत. (Couple Video)

    हा व्हिडिओ (@shayari_in_) या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘अहो ही एक ‘स्त्री’ आहे ! नाते निभावायचे असेल तर ती नाल्यात पडणाऱ्या नशेबाज नवऱ्यासोबतही आयुष्य घालवू शकते, पण सोडायला आली तर ‘बिल गेट्स’लाही सोडेल. 15 सेकंदांची हा छोटासा व्हिडिओ आता अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

    या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं आहे की, स्त्रीला समजणं कठीण आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिलं की, चांगलं कुटुंब, फक्त स्त्री-पुरुषांच्या श्रेणी ठेवून तुलना करू नये. दोघेही मेहनती वाटत आहेत, हेच आहे एक परिपूर्ण कुटुंब.