धानोली पोल्टीफार्ममध्ये १०२ कोंबडयांचा मृत्यू

कारंजा घाडगे (Karanja Ghadge).  तालुक्याच्या धानोली गावाजवळ असलेल्या पोल्टीफार्म मध्ये 102 कोंबडयांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. बर्ड फ्लूचे संकमणाचा धोका असल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे चमुने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पाच कोंबडयांचे नमुने घेत पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

धानोली गावात शेतकरी बुध्देश्वर पाटील यांचे आठ वर्षापासून पोल्ट्रफार्म आहे. 18 जानेवारीला ते शेतात गेले असता 102 कोंबडया मृतावस्थेत आढळून आल्यात. त्यांनी तत्काळ याची सूचना पशुसंवर्धन विभागाला दिली. घटनेचे गांभीर्य पाहता विभागाचे अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. मृत पावलेल्या कोंबडयांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. अन्य कोंबडयाचा शेतातच पुरविण्यात आल्यात. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी प्रवीण भिसे, मोहन खंडारे, मुकुंदा जोगेकर उपस्थित होते. यापूर्वी कारंजा येथील वार्ड नंबर 15 मध्ये 80 कोंबडयांचा मृत्यू झाला होता.

गळा कापल्याचे निशान
पोल्टीफार्ममध्ये मुंगसाने प्रवेश केला असावा. कारण काही कोंबड्यांचे गळ्यावर कापल्याचे निशान दिसून येत आहे. — बुद्धेश्वर पाटील, पोल्टीफार्म मालक, कारंजा.

पाच कोंबडयांचे नमूने पाठविले
घटनेची माहिती मिळताच जिल्हास्तरी चमु घटनास्थळी पोहोचली. बर्ड फ्लू संदर्भात तपासणी केल्यानंतर पाच कोंबडयांचे नमूने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. लवकरच अहवाल प्राप्त होणार आहे. नागरिकांनी न घाबरता सावध राहाते.
मुकूंद जोगेकर, पशुसंवर्धन अधिकारी, पं.स. कारंजा.