वर्धा नदीत उलटली नाव, ११ जण बुडाल्याने उडाली खळबळ

बेनोडा शहीद पोलीस ठाण्याअंतर्गत (Benoda Police) येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत (wardha River) नाव उलटून ११ जण बुडाल्याची(11 People Drowned In Wardha River) धक्कादायक घटना घडली आहे.

    वर्धा : बेनोडा शहीद पोलीस ठाण्याअंतर्गत (Benoda Police) येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत (wardha River) नाव उलटून ११ जण बुडाल्याची(11 People Drowned In Wardha River) धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली असून अद्याप ३ मृतदेह मिळाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील ११ जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. काल विधी आटोपला. त्यानंतर आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून नावेने जात होते.त्यावेळी अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वजण असल्याची प्राथमिक माहिती आहे. अद्यापही तिघांचे मृतदेह हाती लागले. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे. थोड्याचवेळात बचाव पथक दाखल होणार आहे.