भाजपचे १२ नगरसेवकांनी धरली शिवसेनेची वाट; भाजपसमोर गळती रोखण्याचे मोठे आवाहन

विदर्भात (In Vidarbha) शिवसेनेला (Shiv Sena) कमकुवत करू पाहणाऱ्या भाजपला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. जळगावचा गड भाजपच्या हातातून निसटल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) नगरपरिषदेत भाजपचे 10 नगरसेवक (corporators) आणि दोन माजी नगरसेवकांनी (former corporators) शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

    वर्धा (Wardha). विदर्भात (In Vidarbha) शिवसेनेला (Shiv Sena) कमकुवत करू पाहणाऱ्या भाजपला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. जळगावचा गड भाजपच्या हातातून निसटल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) नगरपरिषदेत भाजपचे 10 नगरसेवक (corporators) आणि दोन माजी नगरसेवकांनी (former corporators) शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

    भाजप युवा मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे विदर्भाला (Vidarbha) मुख्य गड समजणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, हिंगणघाट येथे 38 नगरसेवक आहेत. त्यापैकी 28 नगरसेवक भाजपचे होते. आणखी काही नगरसेवक प्रवेश करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी दिली.

    शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. आता तर सुरुवात झाली आहे. आणखीन पंचायत समिती आणि अन्य अनेक लोक प्रवेश करणार आहेत, अशी माहिती अनंतराव गुढे यांनी दिली.

    भविष्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेना भक्कम कशी करावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. लवकरच निवडणूक आहे. तेव्हा हिंगणघाट नगर परिषदेमध्ये बदल घडवून आणू आणि निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास यावेळी अनंतराव गुढे यांनी माहिती देताना व्यक्त केला.

    आता नगरसेवक आलेत, नंतर आमदारही येतील. कापसच्या गंजीला लागलेली आग लवकर समजत नाही. ती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना नंतर समजेल, असा टोला अनंतराव गुढे यांनी यावेळी भाजपला लगावला.