12 lack liqueur sized in hinganghat

कांद्याची वाहतूक करीत असल्याचे भासवत वाहनातुन दारू वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी वाहनासह एकूण १२ लाख १९ हजार रूपयांचा मुद्देंमाल जप्त करण्यात आला आहे.

  • आत एक बाहेर एक कांद्याच्या वाहतुकीत दारूचा साठा

 हिंगणघाट. अवैध वाहतूक करणा-यांनी नवीन शक्कल शोधून काढली. आत एक बाहेर एक असा मालवाहू गाडीमध्ये प्रकार पाहायला मिळाला. कांद्याच्या वाहतुकीत अवैध दारूचा साठा ठेवून पोबारा होण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. वर्धा जिल्हा व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी सर्वांना माहिती आहे. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा व्यवसाय सुरूच आहे. कठोर शासन होत नसल्यामुळे दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे अवैध दारूची कारवाई पोलिसांसाठी रोजचाच विषय आहे. पण, आज मात्र पोलिसांना नवीन अनुभव पाहायला मिळाला.

हिंगणघाट पोलिस ठाण्यात कार्यरत शेखर डोंगर यांना हिंगणघाट येथुन नंदेारी मार्गाने चंद्रपुरकडे दारू नेण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी नंदोरी चौकात नाकाबंदी केली. दरम्यान चंद्रपूरकडे एमएच १० सीए ६१९९ क्रमांकाचे चारचाकी वाहन जात होते. परंतु, त्यात कांदयाचे ट्रे दिसल्याने पोलिसांनी दुर्लक्ष केले. परंतु, संशय आल्याने पोलिसांनी वाहन थांबवुन पाहणी केली. दरम्यान बाहेर कांदा व आत दारूचे खोके आढळून आले. देशी दारूच्या १२० खोक्यामध्ये ९० मिलीच्या १२ हजार शिशा दारू आढळून आल्या. पोलिसांनी वाहन, दारू, ३०० किलो कांदे व एक मोबाईल असा एकूण १२ लाख १९ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगेश अहेरवार (२३), बाबुलाल सदानशिव (३०) रा. मुर्तीजापूर या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांचे मार्गदर्शनात शेखर डोंगरे, नीलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली.