वर्धा जिल्ह्यात आढळले १८ कोरोनाबाधित

वर्धा (Wardha). जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त अहवालापैकी 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 8 पुरूष व 10 महिलांचा समावेश आहे.

कोरोना बाधितांमध्ये वर्धा 12, आर्वी 2, देवळी 1, हिंगणघाट 1, सेलू 1, समुद्रपूर 1 रूग्णाचा समावेश आहे. आष्टी व कारंजा येथे एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 9 हजार 641 झाली आहे. आज 30 तर आतापर्यत 9 हजार 31 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 319 झाली आहे.