वर्धा जिल्ह्यात १८५ नवे कोरोनाबाधित

वर्धा: वर्धा(wardha) जिल्ह्यात कोरोनाचे(corona) रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्हयात आज एकूण १८५ रुग्ण आढळले. यापैकी १०२ पुरूष व ८३ महिला कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. वर्धा तालुक्यातील ८९ रूग्णांमध्ये महिला ४२ व ४७ पुरूषांचा समावेश आहे. देवळी तालुक्यातील१७ रूग्णांमध्ये महिला १० व ७ पुरूष, सेलू तालुक्यात १ महिला,११ पुरुष कोरोनाबाधित आढळले आहे. आर्वी येथील ८ रूग्णांपैकी ४ महिला व ४ पुरुष तर आष्टी येथे ८ रूग्णांपैकी महिला ५ व ३ पुरुष रूग्ण आहे. कारंजातील ४ पैकी १ महिला व ३ पुरुष आहेत. समुद्रपूर तालुक्यात १० रूग्णांपैकी ४ महिला व ६ पुरूष रूग्ण आहेत. तर, जिल्हयात दुसऱ्या क्रमांकावर हिंगणघाट तालुक्याचा समावेश आहे. या तालुक्यात ३७ रूग्णापैकी २१ पुरूष तर १६महिलांचा समावेश आहे. जिल्हयात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१११ झाली. आज ३५ कोरोनामुक्त झाले आहे. तर, आज पुलगाव येथील पुरूष (३७), वर्धा येथील महिला (६२) तर हिंगणघाट येथील महिला (५०) या तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ९८३ झाली आहे.