कार अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात २ जवान जखमी

हिंगणघाट (Hinganghat) : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नागपूर, हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.-7 वर कार अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात सिकंदराबाद येथील सीआरपीएफचे 2जवान जखमी झाले. ही घटना उबदा शिवारात घडली.

  • उब्दा शिवारातील घटना

हिंगणघाट (Hinganghat) : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील नागपूर, हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.-7 वर कार अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात सिकंदराबाद येथील सीआरपीएफचे 2जवान जखमी झाले. ही घटना उबदा शिवारात घडली.

माहितीनुसार 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास सिकंदराबाद येथिल सी.आर.पी.एफ बटालयिनचे जवान रामरतन प्रसाद सिंग वय ( 49 ) व राजेश कुमार वय (39) वर्ष दोन्ही राहणार सिकंदराबाद हे दोघे हैद्राबादवरुन नागपूर बि.आर.01 पि.एल 2680क्रमांकाच्या कारने जात होते.

उब्दा शिवारात रस्त्यावरील खड्डयावरुन कार अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात रामरतन प्रसाद सिंग,राजेश कुमार हे दोघेही जखमी झाले. अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिस मदत केंद्राला मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, ज्योती राऊत, प्रदिप डोंगरे, गौरव खर्डे, राजेंद्र बेले आदी घटनास्थळी पोहचले. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलिस करीत आहे.