भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी ; सावंगी बायपासवरील घटना

माहितीनुसार अनुसार शकील शेख, पंजाब धांदे व सागर परतेकी हे तिघे एमएच २९ एस १२८ क्रमांकाच्या दुचाकीने सालोडकडे जात होते. नागपूर-यवतमाळ मार्गावर सावंगी बायपास उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

    वर्धा. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दोन जणांचा मृत्यू झाला. तर एक गंभीररित्या जखमी झाला. हा अपघात गुरूवारी सायंकाळी ६.४५ वाजे दरम्यान सावंगी बायपासवर घडला. मृतकांमध्ये सालोड (हि.) येथील शकील शेख (६०) व पंजाब धांदे (६५) यांचा समसावेश आहे. तर सागर परतेकी (३०) नामक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे.

    माहितीनुसार अनुसार शकील शेख, पंजाब धांदे व सागर परतेकी हे तिघे एमएच २९ एस १२८ क्रमांकाच्या दुचाकीने सालोडकडे जात होते. नागपूर-यवतमाळ मार्गावर सावंगी बायपास उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात शकील शेख व पंजाब धांदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सागर परतेकी गंभीररित्या जखमी झाला.

    माहिती मिळताच सावंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे वाहतूक प्रभावित झाली होती. जखमीला सावंगी येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सावंगी पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.