जिल्ह्यात आढळले २९ नवीन कोरोना बाधित

जिल्हयात मंगळवारी २९ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात ६८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

वर्धा- जिल्हयात मंगळवारी २९ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात ६८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
कोरोना बाधितांमध्ये वर्धेतील २४ व हिंगणघाट येथे ५ रूग्णांचा समावेश आहे. अन्य तालुक्यात कोरोना आजाराचे रूग्ण आढळून आले नाही. कोरोनाबाधितांमध्ये १७ पुरूष व १२ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९ हजार ५५१ झाली आहे. आज ४१ तर आतापर्यत ८ हजार ९११ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज एकाचा तर आतापर्यत २८७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयातील अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३५९ झाली आहे.