सालोड परिसरात विचित्र अपघातात 3 जण जखमी

यवतमाळ मार्गावर सालोड परिसरातील हॉटेल विशाल समोर झालेल्या विचित्र अपघातात मेडिकल कॉलेजच्या दोन विद्यार्थीनीसह कारचालक जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजताचे दरम्यान घडला.

वर्धा (Wardha).  यवतमाळ मार्गावर सालोड परिसरातील हॉटेल विशाल समोर झालेल्या विचित्र अपघातात मेडिकल कॉलेजच्या दोन विद्यार्थीनीसह कारचालक जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजताचे दरम्यान घडला.

वर्धा ते यवतमाळ मार्गावर सावंगी ते सालोड दरम्यान दरदिवशी अपघात होत राहतात. गुरूवारी सावंगी मेडीकल कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या केतकी पुलाडी व यशस्वी निनावे हया एमएच 39 एक्यू 2319 क्रमांकाच्या दुचाकीने जात होत्या. दरम्यान मागुन येत असलेल्या एमएच 40 वाई 3487 क्रमांकाच्या ट्रकने त्यांचे दुचाकीला धडक दिली. यामुळे दोघेही खाली पडल्या. समोरच्या ट्रकने ब्रेक मारल्याने मागुन येत असलेल्या एमएच 26 बीई 1310 क्रमांकाच्या ट्रकने समोरच्या ट्रकला धडक दिली. सोबतच कारला धडक दिली. यात कारचालक किरकोळरित्या जखमी झाला. केतकी व यशस्वी हया देखील किरकोळ जखमी झाल्यात.

जखमींवर सावंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याअपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सावंगी पोलिसांनी दोनही ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.