corona

वर्धा. दोन महिन्यांत पहिल्यांदा मृत्यू संख्या शुन्य आहे.  आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये १८ पुरूष तर १५ महिलांचा समावेश आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या रूग्णांमध्ये वर्धेतील १७,  देवळीतील १, सेलूतील २,  आर्वी व आष्टी येथील प्रत्येकी २, कारंजा येथील १ तर हिंगणघाट येथील ८ रूग्णांचा समावेश आहे.

एकूण ३३ कोरोनाबाधितांमध्ये १८ पुरूष तर १५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या ६ हजार २०० वर गेली आहे. ५४ जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यत  एकूण कोरोनामुक्त  रूग्णांची संख्या ५ हजार ५५५ वर गेली आहे. आतापर्यत एकूण २०५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात  सध्या  ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ४४० वर गेली आहे.