प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जिल्हा आरोग्य विभागाला शुक्रवारी प्राप्त अहवालापैकी 36 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात वर्धेतील 73, 58 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. कोरोना बाधितांमध्ये वर्धा 27, देवळी 5, हिंगणघाट 2, कांरजा 1 व समुद्रपुर येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

वर्धा (Wardha).  जिल्हा आरोग्य विभागाला शुक्रवारी प्राप्त अहवालापैकी 36 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात वर्धेतील 73, 58 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. कोरोना बाधितांमध्ये वर्धा 27, देवळी 5, हिंगणघाट 2, कांरजा 1 व समुद्रपुर येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

आर्वी, सेलू व आष्टी तालुक्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळला नाही. कोरोनाबाधितांमध्ये 21 पुरूष व 15 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधिंची संख्या 8 हजार 329 झाली आहे. शुक्रवारी 61 तर आतार्पत 7 हजार 767 जण कोरोनामुक्त झाले आहे. आज दोन तर आतापर्यत 261 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधितांमध्ये 301 रूग्णांचा समावेश आहे.