
संचारबंदी २० फेब्रुवारी शनिवारी रात्री ८ ते २२ सोमवार फेब्रुवारी च्या सकाळी आठ वाजेपर्यंत लागू असणार आहे. जीवनावश्यक वस्तू आरोग्य संबंधित काही बाबींना यात सूट दिली.
वर्धा. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागामध्ये बाधितांच्या आकडा वाढत असल्याने रुग्णसंख्या नियंत्रण आणि कोरोनाची साखळी तोडण्या करिता प्रतिबंधक उपाय म्हणून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज १९ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी उद्यापासून जिल्ह्यात ३६ तासाचा कडक संचार बंदीचा आदेश पारित केला आहे.
संचारबंदी २० फेब्रुवारी शनिवारी रात्री ८ ते २२ सोमवार फेब्रुवारी च्या सकाळी आठ वाजेपर्यंत लागू असणार आहे. जीवनावश्यक वस्तू आरोग्य संबंधित काही बाबींना यात सूट दिली.
काय बंद असेल
१) दुकाने, मॉल्स ,मार्केट बंद
२) चहा , पान टपरी
३) वाहतूक, शासकीय एसटी बसेसची सेवा, खाजगी वाहने, खाजगी प्रवासी वाहन, ऑटो
४) सर्व प्रकारची हॉटेल ,रेस्टॉरंट बंद
५) जिम ,व्यायाम शाळा, व जलतरण तलाव बंद.
६) सिनेमागृह.
७) शासकीय व खाजगी ग्रंथालय आठवडी बाजार, गुरांचा बाजार, वाहन दुरुस्ती गॅरेज,बांधकामे, सलून, ब्युटी पार्लर
८) भाजीपाला, फळे यार्ड बंद
९) उद्याने, बगीचे, पर्यटन स्थळ व,वन पर्यटन मनोरंजन पार्क या ठिकाणी दंडात्मक कारवाई.
१०) सर्व वित्तीय संस्था
११) विनाकारण चारचाकी व दुचाकी वरून वाहतूक करणे त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.
१२) सर्व पेट्रोल व डिझेल पंप बंद.
१३) पोलिसांना नाकाबंदी करण्याच्या सूचना.
काय सुरू असेल
१) सर्व प्रकारची औषधे दुकाने सुरू राहतील.
२) एम. आय. डी. सी .अंतर्गत असलेली सर्व औद्योगिक आस्थापना त्यांच्या मजुरांसह सुरू राहील.
३) जिल्ह्यातील सर्व दूध डेरी व विक्री केंद्र सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते १० सुरु असेल.
या आदेशाचा भंग करणार्या कोणत्याही व्यक्तीला भारतीय दंड संहिता १९८० नुसार कलम ८८ अन्वये शिक्षापात्र असलेला गुन्हा दाखल करण्यात येईल. याबाबतचा आदेश पारित करून संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करून त्यांना कारवाई करण्याच्या सूचना केलेले आहे.