प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जिल्ह्यात शनिवारी नवीन ३७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर, एका महिलेचा मृत्यू झाला. त्यात वर्धेतील एका ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

वर्धा (Wardha). जिल्ह्यात शनिवारी नवीन ३७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर, एका महिलेचा मृत्यू झाला. त्यात वर्धेतील एका ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांमध्ये वर्धा २३, आर्वी १, देवळी ५, हिंगणघाट ५, सेलू २, कारंजा येथील एका रूग्णांचा समावेश आहे. आष्टी व समुद्रपूर तालुक्यात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही. एकूण ३७ बाधितांमध्ये २३ पुरूषांचा तर १४ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८ हजार ९४ झाले आहे. आज ४४ तर आतापर्यत एकूण ७ हजार ३८३ झाली आहे. आज एका रूग्णाचा तर आतापर्यत २५४ जणांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ४५६ झाली आहे.