प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी आरोग्य विभागास प्राप्त अहवालापैकी ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एका जणाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका ७० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

वर्धा (Wardha).  जिल्ह्यात शुक्रवारी आरोग्य विभागास प्राप्त अहवालापैकी ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर एका जणाचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका ७० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

कोरोना बाधितांमध्ये वर्धा २८, सेलू २ व हिंगणघाट येथील ८ रूग्णांचा समावेश आहे. आर्वी, देवळी, सेलू, आष्टी व कारंजा आणि समुद्रपूर येथे शुक्रवारी कोरोना आजाराचा एकही रूग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ५७ झाली आहे. आज ६१ तर आतापर्यत ७ हजार ३३९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनामुळे एकूण २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ४६४ झाली आहे.