वर्धा जिल्ह्यात आज आढळले ३८ नवीन कोरोना बाधित रुग्ण

जिल्हयाचे आरोग्य विभागास प्राप्त अहवालापैकी 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 22 पुरूष व 16 महिलांचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये वर्धा 24, देवळी 3, हिंगणघाट 5, सेलू 1, आष्टी 1, कारंजा 2 व समुद्रपूर येथील 2 रूग्णांचा समावेश आहे. आर्वीतालुक्यात आज एकही कारोनाबाधित रूग्ण आढळून आला नाही.

वर्धा (Wardha). जिल्हयाचे आरोग्य विभागास प्राप्त अहवालापैकी 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 22 पुरूष व 16 महिलांचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये वर्धा 24, देवळी 3, हिंगणघाट 5, सेलू 1, आष्टी 1, कारंजा 2 व समुद्रपूर येथील 2 रूग्णांचा समावेश आहे. आर्वीतालुक्यात आज एकही कारोनाबाधित रूग्ण आढळून आला नाही.

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 466 झाली आहे. आज 23 व आतापर्यत 7 हजार 926 कोरोनामुक्त झाले आहे. आज एकाही रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसला तरी आतापर्यत 263 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 276 झाली आहे.