वर्धा जिल्ह्यात आढळले ४१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण

जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त अहवाला पैकी 41 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यात 29 महिला आणि 12 पुरूषांचा समावेश आहे.

वर्धा (Wardha).  जिल्हा आरोग्य विभागास प्राप्त अहवाला पैकी 41 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यात 29 महिला आणि 12 पुरूषांचा समावेश आहे.

कोरोनाबाधितांमध्ये वर्धा 28, देवळी 4, हिंगणघाट 6, सेलू 2 व कारंजा येथील 1 रूग्णांचा समावेश आहे. आर्वी, आष्टी व समुद्रपूर तालुक्यात कोरोना बाधित एकही रूग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 370 झाली आहे. शनिवारी 58 तर आतापर्यत एकूण 7 हजार 825 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला नसला तरी आतापर्यत एकूण 261 जणांचा मृत्यू झाला नाही. आज जिल्ह्यात एकूण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या 284 झाली आहे.