प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जिल्हा आरोग्य विभागाला गुरूवारी प्राप्त अहवालापैकी 42 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात 21 महिला व 21 पुरूषांचा समावेश आहे.

वर्धा (Wardha).  जिल्हा आरोग्य विभागाला गुरूवारी प्राप्त अहवालापैकी 42 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात 21 महिला व 21 पुरूषांचा समावेश आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वर्धा 23, आर्वी 2, देवळी 7, हिंगणघाट 3, कारंजा 2, व समुद्रपूर येथील 5 रूग्णांचा समावेश आहे. सेलू, आष्टी व कारंजा तालुक्यात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नाही. जिल्हयातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 293 झाली आहे. आज 80 तर आतापर्यत 7 हजार 706 जण कोरोना मुक्त झाले आहे. आतापर्यत कोरोनामुळे 259 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 328 झाली आहे.