कोरोना विषाणूचा फोटो
कोरोना विषाणूचा फोटो

वर्धा (Wardha) :  जिल्ह्यात बुधवारी 44 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यात आर्वी येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

वर्धा (Wardha) :  जिल्ह्यात बुधवारी 44 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यात आर्वी येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कोरोनाबाधित आढळलेल्यांमध्ये वर्धा तालुक्यातील 31, देवळी 4, सेलूत 2, समुद्रपूरात 3, हिंगणघाट तालुक्यातील 4 महिलांचा समावेश आहे. एकूण पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये 23 पुरूष व 21 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 570 झाली आहे. आज एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यत एकूण 173 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 532 झाली आहे.