जिल्ह्यात शनिवारी आढळले ४५ कोरोनाबाधित; चार जणांचा मृत्यू

वर्धा (Wardha): आरोग्य विभागाला प्राप्त कोरोना अहवालापैकी 45 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये वर्धा तालुक्यातील 66 वर्षीय पुरूष, देवळीतील 23 वर्षीय युवक, समुद्रपूर येथील 30 वर्षीय महिला व सेलू येथील 36 वर्षीय युवकाचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यात शनिवारी पॉझिटीव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये वर्धा तालुक्यात 24, देवळीतील 6, कारंजातील 8, आष्टी येथील 3, समुद्रपूर 1 व हिंगणघाट तालुक्यातील 3 रूग्णांचा समावेश आहे. एकूण 45 रूग्णांमध्ये 23 पुरूष व 22 महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या 5 हजार 755 वर गेली आहे. 224 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. एकूण 4 हजार 491 कोरोनामुक्त झाले आहे. शनिवारी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 182 जणांचा मृत्यू झाला आहे.