वर्धा जिल्ह्यात आज आढळले ४६ कोरोनाबाधित रुग्ण

जिल्हयाचे आरोग्य विभागास प्राप्त अहवालापैकी 46 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 29 पुरूष व 17 महिलांचा समावेश आहे. कोरोना बाधितांमध्ये वर्धा 30, देवळी 7, हिंगणघाट 7, सेलू 1, कारंजा येथील 1 रूग्णांचा समावेश आहे. आर्वी, आष्टी व कारंजा येथे एकही कारोना बाधित रूग्ण आढळून आला नाही.

वर्धा (Wardha).  जिल्हयाचे आरोग्य विभागास प्राप्त अहवालापैकी 46 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 29 पुरूष व 17 महिलांचा समावेश आहे. कोरोना बाधितांमध्ये वर्धा 30, देवळी 7, हिंगणघाट 7, सेलू 1, कारंजा येथील 1 रूग्णांचा समावेश आहे. आर्वी, आष्टी व कारंजा येथे एकही कारोना बाधित रूग्ण आढळून आला नाही.

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 592 झाली आहे. आज 33 तर आतापर्यत 8 हजार 55 जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यत कोरोना आजाराने 264 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह व पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 259 झाली आहे.