वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे ४७५ बळी; मंगळवारी १० जणांचा मृत्यू

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे मृत्यूचाही आकडा फुगतांना दिसत आहे. आजपर्यंत 475 जणांचा बळी गेला असून मंगळवारी तब्बल रेकाँर्ड ब्रेक 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

  वर्धा (Wardha).  जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे मृत्यूचाही आकडा फुगतांना दिसत आहे. आजपर्यंत 475 जणांचा बळी गेला असून मंगळवारी तब्बल रेकाँर्ड ब्रेक 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

  मंगळवारी हाती आलेल्या कोरोना चाचणी अहवालवात जिल्ह्यात एकूण 385 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक वर्धा तालुक्यात 190 बाधितांचा समावेश आहे. त्यात 106 पुरुष तर 84 महिला आहेत. याशिवाय हिंगणघाट 74 (पुरुष 47 महिला 27), देवळी 25 (पुरुष 17 महिला 8), आर्वी 35 (पुरुष 21 महिला 14), आष्टी 3 (पुरुष 1 महिला 2), कारंजा 6 (पुरुष 2 महिला 4), समुद्रपूर 27 (पुरुष 16 महिला 11), सेलू 25 (पुरुष 13 महिला 12) अशा एकूण 385 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये पुरुष 223 तर 162 महिला आहेत.

  वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात झालेल्या चाचण्या 2764 असून त्यात 385 पॉझिटिव्ह आहेत. आयसोलेशनमध्ये असलेले एकूण 2302 व्यक्ती आहेत. आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठवलेले एकूण स्त्रावनमुने 1 लाख 96 हजार 864 असून त्यापैकी 1 लाख 96 हजार 845 अहवाल प्राप्त झाले आहेत.

  पैकी निगेटिव्ह 1 लाख 74 हजार 989 असून प्रलंबित अहवाल 19 आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित संख्या 20 हजार 391 आहे. तर आज 251 कोरोनामुक्त झाले तर एकूण 18 हजार 204 कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 1712 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

  वर्ध्यात सर्वाधिक सात मृत्यू
  जिल्ह्यात मंगळवारी मृत्यूची संख्या 10 वर पोहचली आहे. त्यात सर्वाधिक वर्धा तालुक्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यात (वर्धा- पुरुष वय 75, 60, 65, 50, महिला- वय 14, 58, 69, हिंगणघाट- पुरुष वय 71, महिला वय 62, समुद्रपूर- पुरुष वय 68) समावेश आहे.