वर्धा जिल्ह्यात शनिवारी आढळले ५८ कोरोनाबाधित

वर्धा (Wardha).  जिल्हा आरोग्य विभागास आज प्राप्त अहवालापैकी 58 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना बाधितांमध्ये 27 पुरूष व 31 महिलांचा समावेश आहे.

कोरोना बाधितामध्ये वर्धा 39, आर्वी 2, देवळी 3, हिंगणघाट 11, सेलू 2 व कारंजा येथील 1 रूग्णाचा समावेश आहे. समुद्रपूर व आष्टी तालुक्यात शनिवारी कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले नाही. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 8 हजार 650 झाली आहे. आज 37 कोरोनामुक्त तर आतापर्यत एकूण 8 हजार 92 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्हयात एकूण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 293 झाली आहे.