वर्धा जिल्ह्यात मंगळवारी आढळले ६५ कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात मंगलवारी 65 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एका जणाचा मृत्यू झाला आहे. मृतकामध्ये वर्धेतील २९ वर्षीय युवकाचा समावेश आहे. एकूण मृतकांची संख्या 259 झाली आहे.

वर्धा (Wardha). जिल्ह्यात मंगलवारी 65 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात एका जणाचा मृत्यू झाला आहे. मृतकामध्ये वर्धेतील २९ वर्षीय युवकाचा समावेश आहे. एकूण मृतकांची संख्या 259 झाली आहे.

कोरोना बाधितांमध्ये 43 पुरूष व 22 महिलांचा समावेश आहे. यात वर्धेतील 35, आर्वीत 4, देवळीत 7, हिंगणघाट 13, सेलूत 2 कारंजा 2, समुद्रपूर येथील 2 रूग्णांचा समावेश आहे. जिल्हयातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 216 झाली आहे. मंगळवारी 61 कोरोना बाधित तर आतापर्यत 7 हजार 574 रूगण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्हयातील एकूण ऍक्टिव्ह रूग्णांची संख्या 383 झाली आहे.