जिल्ह्यात सोमवारी आढळले ७ कोरोनाबाधित रुग्ण

आरोग्य विभागाला प्राप्त अहवालापैकी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये वर्धा येथील 68 व समुद्रपूर येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

वर्धा (Wardha). आरोग्य विभागाला प्राप्त अहवालापैकी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये वर्धा येथील 68 व समुद्रपूर येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कोरोना बाधितांमध्ये वर्धेतील 6 व कारंजा येथील एका महिलेचा समावेश आहे. सेलू, देवळी, आर्वी,आष्टी, हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात कोरोना आजाराचा एकही रूग्ण आढळून आला नाही. एकूण कोरोना बाधितांमध्ये 5 पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 428 झाली आहे. आज 23 तर आतापर्यत 7 हजार 903 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सोमवारी 2 महिलांचा तर आतापर्यत जिल्ह्यात एकूण 264 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हयात सध्या 261 अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्ण आहे.