कोरोनाचा प्रतीकात्मक फोटो
कोरोनाचा प्रतीकात्मक फोटो

  • ५ जणांचा मृत्यू

वर्धा (Wardha): जिल्ह्यात शनिवारी प्राप्त अहवालात ७४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर, पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात वर्धेतील ५८ वर्षीय आणि ७२ वर्षीय पुरूष, देवळी येथील ५० वर्षीय, ६० वर्षीय पुरुष व हिंगणघाट येथील ४८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांमध्ये वर्धेतील ४८, देवळीतील १२, सेलूतील ३ महिला, आर्वीतील १ पुरूष, आष्टीतील २ पुरूष, कारंजातील १ पुरूष, हिंगणघाट येथील ४ तर समुद्रपूर येथील ३ पुरूषांचा समावेश आहे. एकूण ७४ कोरोनाबाधितांमध्ये ४७ पुरूष व २७ महिलांचा समावेश आहे. अहवाल निगेटीव्ह आल्याने ३६० जणांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार ३७१ वर गेली आहे. शनिवारी एकूण ८८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण ३ हजार २७० कोरोनामुक्त झाले आहे. शनिवारी ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ९४० आहे.