प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

वर्धा येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने शहर व जामणी गावात केलेल्या कारवाईत ७६१ ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तालुक्याच्या जामनी येथील रहिवाशी राजेंद्र सदाशिव झाडे (५३) याची अंगझडती घेण्यात आली. त्याच्याजवळ प्लास्टिक पिशवीमध्ये २७५ ग्राम गांजा आढळून आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सौरभ घरडे व चमूने केली. यासंबंधात हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

हिंगणघाट (Hinganghat). वर्धा येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने शहर व जामणी गावात केलेल्या कारवाईत ७६१ ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तालुक्याच्या जामनी येथील रहिवाशी राजेंद्र सदाशिव झाडे (५३) याची अंगझडती घेण्यात आली. त्याच्याजवळ प्लास्टिक पिशवीमध्ये २७५ ग्राम गांजा आढळून आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सौरभ घरडे व चमूने केली. यासंबंधात हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

दुसरी कारवाई संत चोखोबा वार्डात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटणकर यांच्या नेतृत्वात डीबी पथकाच्यावतीने करण्यात आली. संत चोकोबा वार्ड येथील सय्यद तौसिफ सय्यद बाबू (२२) यांच्या घरी अंगझडती घेतली. त्याच्याकडून ४८६ ग्राम गांजा जप्त करण्यात आली. आरोपीने सदर गांजा वार्डातील शहबाज अली यांच्याकडून विकत घेतल्याचे बयानात नमूद केले आहे पोलिसांनी दोनही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपी शहबाज फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे गांजा विक्रीमध्ये हिंगणघाट शहर व ग्रामीण भागात वाढ झाली आहे. गांजा पिणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गांजा तेलंगणा व आंध्रप्रदेश या जवळच्या राज्यातून आणण्यात येत आहे. यानंतर शहरात व ग्रामीण भागात याची सर्रास विक्री केल्या जात आहे. गांजा ओढणा-या शौकिनांची संख्या वाढत आहे. अद्यापही शहरात कारंजा चौक, आंबेडकर चौक व इतर जागी गांजा व अन्य अमली पदार्थ सर्रास विकल्या जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने विशेष दखल घेऊन गांजाची तस्करी करणा-यांवर मोठी कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा जनतेतून करण्यात आली आहे.