corona in wardha

कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली होती. दिवाळीच्या सणामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शासनाने घालून दिलेल्या लॉकडाऊन काळानंतर नागरिकांना सर्वच क्षेत्रात सूट मिळाल्याने नागरिक खरेदीकरिता बाजारात मोठ्या प्रमाणात बाहेर पडले.

वर्धा. दिवाळीची धामधूम आटोपल्यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा आज एकदम वाढला. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १७९ स्त्राव तपासणीकरिता दिले असता यापैकी ७७ कोरोना बाधित निघाले आहे. सर्वात जास्त ४६ वर्धा विभागातील रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली होती. दिवाळीच्या सणामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शासनाने घालून दिलेल्या लॉकडाऊन काळानंतर नागरिकांना सर्वच क्षेत्रात सूट मिळाल्याने नागरिक खरेदीकरिता बाजारात मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. शेतकरी मजूर नोकरदार वर्ग व्यापारी वर्गानी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवाळीनंतर अचानक कोरोनाची लाट येऊ शकते.

असा अंदाज आरोग्य विभागाने पहिलेच व्यक्त केला होता. दिवाळीच्या काळामध्ये कोरोना टेस्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. वातावरणात बदल झाल्याने सुद्धा आजार बळावत आहे. आरोग्य विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण ७७ कोरोना बाधित आढळून आले आहे. वर्धा येथे ४६ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. यात २९ पुरूष व १७ महिलांचा समावेश आहे. देवळी तालुक्यात १८ रूग्ण आढळले आहे. यात १२ पुरूष व ६ महिलांचा समावेश आहे. हिंगणघाट तालुक्यात ६ रूग्ण आढळून आले. त्यात ३ पुरूष व ३ महिलांचा आहेत. आष्टी येथे रूग्ण आढळले असून २ पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. कारंजा येथे २ पुरुष रूग्ण, समुद्रपूर येथे १ पुरुष व सेलू तालुक्यातील १ पुरूषाचा समावेश आहे.

आर्वी तालुक्यात कोरोनाची बाधा झाली नाही. ७७ कोरोना बाधित रुग्णांपैकी पन्नास पुरुष व सत्तावीस महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आज फक्त १७९ रुग्णांचे स्त्राव तपासणीकरिता दिले होते. त्यापैकी ७७ रुग्णांना कोरोना ची बाधा झाली हे उल्लेखनीय आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित ७२७१ रुग्ण झाले असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ४१० आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. परंतु, जिल्ह्यात आजपर्यंत २२९ रुग्ण यामुळे मृत्यू पावले.