जिल्ह्यात मंगळवारी आढळले ७९ कोरोनाबाधित; पाच जणांचा मृत्यू

वर्धा (Wardha):  आरोग्य विभागाला मंगळवारी प्राप्त अहवालापैकी 79 रुग्णांना कोवीडची लागण झालेली आहे. 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये आष्टी येथील 65, हिंगणघाट येथील 70, 74 वर्षीय पुरूषाचा तर देवळी येथील 54 व कारंजा येथील 67 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

मंगळवारी कोरोनाबाधित आढळून आलेल्यांमध्ये वर्धा तालुक्यातील 43, देवळीतील 9, सेलूतील 3, आर्वीतील 5 पुरुष, कारंजा येथील 4 महिला, हिंगणघाट तालुक्यातील 13 व समुद्रपूर येथील 2 पुरुषाचा समावेश आहे. यामध्ये एकूण57 पुरूष व 22 महिलांचा समावेश आहे. कोरोना अहवाल निगेटीव्ह असल्याने 372 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 हजार 526 वर पोहोचली आहे. आज एकूण 175 जण कोरोनामुक्त झाले आहे. एकूण 3 हजार 665 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. एकूण 172 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ऍक्टीव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 689 वर पोहोचली आहे.