गिरडमध्ये मास्क न वापरणा-यांकडून १९ हजारांचा दंड वसूल

वर्धा जिल्ह्यातील गिरड गाव पर्यटक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. गिरड पोलिसांनी गावातील व गावाबाहेरून आलेल्या मास्क लावून नसलेल्या नागरिकांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. या अंतर्गत प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. प्रशासनाने एकूण १९ हजार ८०० रूपयांचा दंड वसून केला आहे.

गिरड (Girad).  वर्धा जिल्ह्यातील गिरड गाव पर्यटक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. गिरड पोलिसांनी गावातील व गावाबाहेरून आलेल्या मास्क लावून नसलेल्या नागरिकांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. या अंतर्गत प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. प्रशासनाने एकूण १९ हजार ८०० रूपयांचा दंड वसून केला आहे.

गिरड हे गाव पर्यटनस्थळ आहे. यामुळे बाहेरगाव वरून नागरिक येतात. मास्क न वापरल्याने कोरोना आजाराचे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ग्रामपंचायत प्रशासन व पोलिसांच्या वतीने मास्क न लावणा-यांवर कारवाई करीत २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. एकूण १९ हजार ८०० रूपये दंड वसूल करण्यात आला. ही रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली. दंडाची वसुली म्हणून पावती देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी पालन करण्याचे करावे.

गावाची परिस्थिती लक्षात घेता सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. ही कारवाई वाहतूक पोलिस व त्यांचे सहकारी तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी करीत आहे. यापुढे सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. यानंतर मास्क न वापरणा-या चालकाचे गाडीला चालान व दंड दोन्ही दंड आकारण्यात येईल, असे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे. याची बाबा शेख फरीद दर्ग्यावर येणा-या भाविकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.