प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

समुद्रपूर (Samudrapur):  मागील काही दिवसांपासून कोरोना संक्रमण वाढत आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये संक्रमण अधिकच वाढण्याची शक्यता असल्यामुळे नवरात्र ते दिवाळी दरम्यान एक महिना विशेष मोहिम राबविल्या जाईल. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश तहसिलदार राजु रणवीर यांनी दिले.

  • तहसिलदारांनी दिले आदेश

जिल्हाधिका-यांच्या आदेशान्वये येथील तहसील कार्यालयात तहसिलदार रणवीर यांच्या उपस्थितीत व्यापारी असोसिएशन नगर पंचायत व पोलिस विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी विना मास्क फिरणा-यांकडून 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याच्या सूचना तहसिलदार राजु रणवीर यांनी दिल्या. प्रत्येक व्यवसायिकांनी नो मास्क , नो प्रवेश असे दुकानाच्या दारावर लिहण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. ५ जणांच्या वर दुकानात गर्दी करु नये. विना मास्क दुकानात दिसल्यास त्याला 500 रुपयांचा दंड व दुकान 3 दिवस सील करण्यात येऊन एक महिन्यांकरिता दुकान बंद ठेवावे लागेल. तसेच प्रत्येक दुकानात हात धुण्याकरिता साबण व सॅनिटायझर ठेवणे ,सोशल डिस्टंन्स पाळणे आवश्यक आहे. बैठकीला नगरपंचायत नगराध्यक्ष गजानन राऊत, ठाणेदार हेमंत चांदेवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल गांधी, गणेश अग्रवाल, रवी घोटे आदींसह व्यापारी उपस्थित होते.