प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

हेडंबा मशीनमध्ये दबल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या मजुराचा उपचाराचे दरम्यान मृत्यू झाला. ही घटना भोसा येथील शेत परिसरात घडली. ज्ञानेश्वर यशवंत रंघे (23) असे मृतकाचे नाव आहे.

वर्धा (Wardha). हेडंबा मशीनमध्ये दबल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या मजुराचा उपचाराचे दरम्यान मृत्यू झाला. ही घटना भोसा येथील शेत परिसरात घडली. ज्ञानेश्वर यशवंत रंघे (23) असे मृतकाचे नाव आहे.

माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हयाचे पळसगाव येथील ज्ञानेश्वर रंघे काही दिवसांपासून भोसा येथे राहत होता. 24 ऑक्टोंबरला ते दिलीप दांडेकर यांचे शेतात काम करीत होते. हेडंबा मशीनमध्ये आल्याने दोनही हात कटल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना जखमी अवस्थेत सेवाग्राम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचाराचे दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.