;प्रतिकात्मक फोटो
;प्रतिकात्मक फोटो

आर्वी (Arvi) : मोहा सडवा चोरल्याच्या संशयावरुन तरुणाला रॉडने मारहाण करुन जखमी केले. ही घटना सावळापूर अडेगाव परिसरात घडली. असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव रेवतसिंह आपसिंह अहेरे असे आहे.

आर्वी (Arvi) : मोहा सडवा चोरल्याच्या संशयावरुन तरुणाला रॉडने मारहाण करुन जखमी केले. ही घटना सावळापूर अडेगाव परिसरात घडली. असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव रेवतसिंह आपसिंह अहेरे असे आहे.

सावळापुर अडेगाव परिसरात रेवतसिंह आपसिंह अहेरे यांचे शेत आहे. येथील शेत शिवारात सोनु सोमकुंवर याचा हातभट्टी दारुचा व्यवसाय आहे. त्याकरिता लागणारा मोह, सडवा तो शेतात साठवून ठेवतो. मागील काही दिवसांपासून शेतातील मोहा व सडव्याची चोरी होत असल्याच्या संशयावरुन सोनु सोमकुवर याने रेवतिसंहला रॉडने मारहाण केली. यामध्ये तो जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी सोनु सोमकुंवर विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.