रस्ते, पूल बांधकामामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती; मंत्री नितीन गडकरी

वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोट्यवधींचे रस्ता व पूल बांधकामे (Construction of crores of roads and bridges) झाले आहेत. अनेक कामांना मंजुरी (Approval of several works) प्रदान करण्यात आली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली (The development of Wardha district gained momentum).

    हिंगणघाट (Hinganghat).  वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोट्यवधींचे रस्ता व पूल बांधकामे (Construction of crores of roads and bridges) झाले आहेत. अनेक कामांना मंजुरी (Approval of several works) प्रदान करण्यात आली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली (The development of Wardha district gained momentum), असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

    नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग सातवरील हिंगणघाट येथील नांदगाव चौरस्त्यावरील ८५.२८ कोटींच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी, महामार्गावरील शेडगाव चौरस्ता येथे ४७.७८ कोटींच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले. हिंगणघाट कृषी बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा करून बाजार समितीने सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी शीतगृहाचे बांधकाम करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन गडकरी यांनी सभापती सुधीर कोठारी यांना दिले.

    तसेच हिंगणघाट बाजार समितीने योगदान दिल्यास हिंगणघाट येथे अद्यावत रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय उभारणे शक्य आहे. यासाठीसुद्धा सर्वपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेमडीसिव्हर औषधीची निर्मिती होत असल्याने जगात वर्धा जिल्ह्याचे नाव पोहोचले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. जिल्ह्यात मोठ्या संखेने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत असल्याने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. सरतेशेवटी कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.