चोरीप्रकरणी आरोपीस अटक; चोरीतील रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश

समुद्रपूर येथील बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या ठेवल्यातून रुपये चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. राहुल तुमडाम (24) रा. जाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    समुद्रपूर (Samudrapur).  बसस्थानकाचे परिसरात असलेल्या ठेवल्यातून रुपये चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. राहुल तुमडाम (24) रा. जाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या रकमेपैकी काही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

    माहितीनुसार सुमन जयसिंग भाजीखाये (45) यांचा जाम येथील बसस्थानकाचे परिसरात फळविक्रीचे दुकान आहे. दुकानाचे मागे पतीचा चपला व जोडे दुरस्तीचा ठेला आहे. फळवितरकास पैसे द्यायचे असल्याने त्यांनी 4 हजार रुपये टिनाचे ठेल्यात ठेवले होते. दरम्यान अज्ञात चोरटयाने ते चोरी केले. या प्रकरणी समुद्रपूर पोलिसांत तक्रार करताच अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात आला. हवालदार नीलेश पेटकर व चमूने आरोपीचा शोध घेत राहुल तुमडाम यांस ताब्यात घेऊन विचारपूस केली.

    आरोपीने रुपये चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या रकमेपैकी काही रक्कम त्याने खर्च केली. उर्वरित 1 हजार 900 रूपये व फिर्यादीचे आधारकार्ड जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम व ठाणेदार हेमंत चांदेवार यांचे मार्गदर्शनात नीलेश पेटकर, विक्की म्हस्के, मनोज कोसुरकर व समीर कुरेशी यांनी केली.