सांबराची शिकार करणारे आरोपी गायब

वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद तालुक्याच्या आबाद किन्ही गावाजवळच्या जंगलात हाय व्होल्टेज वीज तारांचा आकोडा टाकून सांबराची शिकार करण्यात आली. या प्रकरणात वन विभागाची भूमिका सुरवातीपासूनच संशयाचे भोव-यात आले. यातील आरोपी गावातून अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

आष्टी शहीद (Ashti Shahid).  वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद तालुक्याच्या आबाद किन्ही गावाजवळच्या जंगलात हाय व्होल्टेज वीज तारांचा आकोडा टाकून सांबराची शिकार करण्यात आली. या प्रकरणात वन विभागाची भूमिका सुरवातीपासूनच संशयाचे भोव-यात आले. यातील आरोपी गावातून अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

26 नोव्हेंबर रोजी हाय व्होल्टेज वीज पुरवठा करून सांबराची शिकार करण्यात आली. या प्रकरणात सुरवातीपासूनच वन विभागाची भूमिका संशयाचे भोव-यात आहे. शिकार करणारे आरोपी गावातून अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 27 नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. शिकार केल्यानंतर मृत सांबराचे मास व अंग कापून प्रकरण निपटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिका-यांनी धाड टाकली. परंतु, आरोपी त्यांच्या हाती लागले नाही. घटनेनंतर मृत सांबराची उच्चस्तरीय पशुवैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते. परंतु, असे करण्यात आले नाही. प्रकरण दवडण्यासाठी गावातील काही नेत्यांना हाताशी धरून अंधारात पंचनामा करण्यात आला.

पंचनाम्यावर हस्ताक्षर करणा-यांना ही बाब कोणालाही न सांगण्याचे सांगण्यात आले. प्रकरणाची माहिती आष्टी शहरात आल्यानंतर गावातील काही नागरिकांनी वरिष्ठांना विचारणा केली. ज्या ठिकाणी मांसाचे तुकडे पडले होते. त्यातील काही तुकडे वन विभागाचे कर्मचारी घरी घेऊन गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वनविभाग आता हे प्रकरण लपविण्याचा प्रयत्न करीत आहे.

तपासात सत्य समोर येईल
शिकारीच्या संदर्भात मला काहीच माहिती नाही. वनकर्मचारी व वनपालने मांस जप्त करण्याची जबाबदारी गुप्त ठेवली. याप्रकरणी तपासानंतर सत्य समोर येईल. — सुहास पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी शहीद