wardha crime

  • अन्य तीन जणांना तीन महिन्याची शिक्षा
  • जिल्हा न्यायालयाचा निर्णय

वर्धा. जुने वादाचे कारणावरून शेजा-याची हत्या करणा-या आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गजानन चंद्रभान नागपुरे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश मृदुला भाटीया यांची हा निर्वाळा दिला. यांसह आरोपीस पाज हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे. अन्य तीन आरोपींना तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.त्यामध्ये मंगेश नागपुरे, चंद्रभान नागपुरे, माधुरी नागपुरे यांचा समावेश आहे. अन्य एक आरोपी मोरेश्वर सदाशिव मांढरे यांसह पुरव्या अभावि निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

माहितीनुसार देवळी तालुक्यांतील सोनोरा ढोक येथील भारत ठाकरे यांचे घराजवळ गजानन नागपुरे यांचे कुटुंबीय राहते. त्यांच्यात नेहमी काही ना काही कारणावरून वाद होत होता. दरम्यान ८ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजताचे दरम्यान भारत गोविंद ठाकरे हे काकाचे घरासमोर बसले होते. त्याचवेळी मृतक गोविंद चंपतराव ठाकरे (५०) पायदल जात होते. याच दरम्यान मंगेश नागपुरे यांनी गोविंद ठाकरे यांचे डोळयात मिरची पावडर फेकले. यानंतर आरोपी आरोपी गजानन नागपुरे याने चाकुने वाद केले. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी आरोपपत्र दाखल केले. शासनाचे वतीन 16 जणांची साक्ष तपासण्यात आली. शासनाचे वतीने ॲड. गिरीश.वी. तकवाले यांनी बाजु मांडली. आरोप सिध्द झाल्याने आरोपी गजानन नागपुरे यांस आजीवन कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अन्य तीन आरोपींना तीन महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली.