आमदार दादाराव केचे ( वर्धा)
आमदार दादाराव केचे ( वर्धा)

आर्वी (Arvi) : निम्म वर्धा धरणात शंभर टक्के जलसाठा केल्याने धरणाचे पाणी झिरो लेवल पार करून मागे सरकून अधिग्रहित न केलेल्या जमीन क्षेत्रामध्ये शिरत आहे. बॅक वॉटरमुळे शेतातील पिके व जमीन बाधित झाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतक-यांवर संकट कोसळले आहे. या जमिनी अधिग्रहित करून शेतक-यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आमदार दादाराव केचे यांनी अलीकडेच केली आहे.

  • आमदार दादाराव केचे यांची मागणी

निम्म वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे प्रकल्पासाठी आधी अधिग्रहित न केलेल्या शेतजमीत पाणी शिरले आहे. जमीनी धरणामध्ये संपादित न केल्याने उत्पन्न घेण्याच्या आशेने शेतक-यांनी शेतीत पेरणी करून मेहनतीने पिके उभी केली होती. परंतु, यावर्षी तालुक्यातील राजापुर गावात पाणी शिरले आहे. लोकांच्या अगदी घरापर्यंत पाणी आल्याने गावक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा व रात्रीच्या वेळी जलचर प्राण्यांचा मुक्त संचारामुळे गावातील लोकांची, जनावरांची प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देऊरवाडा गावातील वर्धा नदीकाठी राहत असलेल्या क्षेत्रात पाण्यामुळे लोकांच्या घरामध्ये ओल निर्माण होऊन घरांची पडझड होत आहे. त्यामुळे राजापुर गावाचे पुनर्वसन व देऊरवाडा गावातील बाधित क्षेत्रातील घरांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार दादाराव केचे यांनी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विभाग यांचेकडे केली आहे. यांसह नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्यात यावी, अशी मागणी कृषी विभागाकडे केली आहे.