माजी आमदार प्राध्यापक राजू तिमांडे
माजी आमदार प्राध्यापक राजू तिमांडे

  • जनप्रतिनिधींनी गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेण्याची गरज

हिंगणघाट (Hinganghat).    हिंगणघाट शहरामध्ये जनता कर्फ्यू लावण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात बाबत तसेच जनता कर्फ्यू मध्ये छोट्या विक्रेत्यांना संरक्षण मिळण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी वर्धा तसेच उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना पत्राद्वारे मत व्यक्त केले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू लावण्या संबंधाने दिनांक २३ सप्टेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात यावी तसेच त्या बैठकीमध्ये शहरातील मोठ्या व्यवसायिकांनी सोबत लहान व्यवसायिक भाजी व फळ विक्रेता , ऑटो रिक्षा चालक, हॉकर्स इतर व्यवसायिक सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रतिनिधी यांना बोलावून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असे मत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी व्यक्त केले आहे.

दिनांक २१ सप्टेंबरला उपविभागीय कार्यालय हिंगणघाट येथे बैठक आयोजित करण्यात आली होती असे आम्हाला कळले परंतु त्या बैठकीला सर्व पक्ष लोकांना बोलविण्यात आले नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देतो याची दखल घ्यावी. दररोज कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या गोरगरीब जनतेचे हित लक्षात घेऊन जनता कर्फ्यूची मांडणी करावी. हिंगणघाट शहर व परिसर शेतकरी-शेतमजूर कामगारांचे आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसापासून झोपडपट्टीत राहणाऱ्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी मोठ्या व्यवसायिकांन पासून छोट्या व्यावसायिकांचा विचार करणे आवश्यक आहे .कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे राजकारण कोणीही करू नये.जनहितार्थ त्वरित दखल घ्यावी. असे मत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे.