जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय, हिंगणघाट
जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय, हिंगणघाट

प्रा. अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणीतील सोमवारपासून सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवशी अभियोग पक्षाच्यावतीने तीन साक्ष नोंदविण्यात आले. मंगळवारी आणखी काही साक्षीदार नोंदविले जाऊ शकतात, असे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले. साक्षीदारांची उलटतपासणीही आज आरोपीच्या वकिलांच्या वतीने करण्यात आली. सोमवारी सकाळी 11 वाजता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समोर प्रकरणाच्या सुनावणीला सुरवात झाली.

वर्धा (Wardha).  प्रा. अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणीतील सोमवारपासून सुरुवात झालेली आहे. पहिल्या दिवशी अभियोग पक्षाच्यावतीने तीन साक्ष नोंदविण्यात आले. मंगळवारी आणखी काही साक्षीदार नोंदविले जाऊ शकतात, असे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले. साक्षीदारांची उलटतपासणीही आज आरोपीच्या वकिलांच्या वतीने करण्यात आली. सोमवारी सकाळी 11 वाजता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समोर प्रकरणाच्या सुनावणीला सुरवात झाली.

दुपारी अर्धा तासाच्या विश्रांती नंतर सायंकाळी 4.15 मिनिटापर्यंत प्रकरणाचे सलग कामकाज चालले. अभियोग पक्षाच्यावतीने शव परीक्षण पंचनाम्याच्या पंच साक्षीदार नागपूरच्या देशमुख, मातोश्री कुणावार कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर आणि घटनास्थळवरील पंच सचिन बुटले या तीन जणांच्या साक्ष आज नोंदविण्यात आल्या. या साक्षीदारांची उलटतपासणी आरोपीचे वकील अॅड. भूपेंद्र सोने घेतली.

आज प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि आणखी काही साक्ष होण्याची शक्यता आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अंकीता जळीत प्रकरणासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेले प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील अॅड. प्रसाद सोईतकर यांनी सहकार्य केले. या जळीतकांड प्रकरणाच्या चौकशी अधिकारी पोलिस उपविभागीय अधिकारी तृप्ती जाधव याही न्यायालयात उपस्थित होत्या. प्राध्यापिका अंकीता पिसुड्डे मातोश्री कुणावर कॉलेजमध्ये जात असताना ३ फेब्रुवारीला नंदोरी चौक समोर आरोपीने पाठीमागून येऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले होते. यात अंकीता गंभीर जखमी होऊन नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

प्राचार्य डॉ .तुळसकर यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी पीडित प्राध्यापिकेला रुग्णालयात दाखल केले होते. प्राचार्य डॉ. तुळसकर यांची साक्ष घेण्यात आली, असे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी पत्रकारांना सांगितले. आज न्यायालयात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे यालाही उभे करण्यात आले. न्यायालय परिसरात आज सुनावणी दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.