wardha

  • जिल्हा मलेरिया अधिकारी जयश्री थोटे यांचानेतृत्वात चमु दाखल

समुद्रपूर. शहरातील वार्ड क्रमांक ६ मध्ये डेंगू आजाराचे थैमान घातले. यासंदर्भात दैनिक नवराष्ट्रमध्ये बातमी झळकताच जिल्हा आरोग्य विभाग खडबडुन जागा झाला. जिल्हा मलेरिया अधिकारी जयश्री थोटे यांनी शहरातील वार्ड क्रमांक ६ मध्ये घरोघरी जावून डेंग्यू आजारापासून बचाव कसा करावा? याविषयी मार्गदर्शन केले.
शहरातील वार्ड क्रमांक ६ मध्ये २५ डेंग्यू आजाराचे रूग्ण या आशयाच्या मथळयाखाली दैनिक नवराष्ट्रमध्ये शुक्रवारी बातमी प्रकाशित करण्यात आली. बातमी प्रकाशित होताच आरोग्य विभाग खडबडुन जागा झाला. जिल्हा मलेरिया अधिकारी जयश्री थोटे यांचे नेतृत्वात आरोग्य विभागाची चमू गावात पोहोचली. सेवाग्राम येथील रूग्णालयात आजपर्यत एकही डेंग्यूचा रूग्ण आढळून आला नाही. त्यामुळे आम्हाला माहिती मिळाली नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

रूग्ण शासकीय रूग्णालयात येवुन उपचार घेत नाही. खासगी दवाखाण्यात उपचार करतात. तिथे डेंग्यूचे निदान लागल्यास रक्ताचे नमूने घेवून सेवाग्राम दवाखाण्यात पाठवावे. खासगी प्रयोगशाळेतील स्केनिंग रिपोर्टमध्ये आम्हाला डेंग्यू विषयी योग्य ती माहिती मिळत नाही. असे डॉ. थोटे यांनी मार्गादर्शन करतांना सांगितले. यावेळी औषधी निर्माण अधिकारी लोखंडे, आरोग्य अधिकारी कालसर्पे, आरोग्य पर्यवेक्षक पंडित, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भगत, पावडे, मुंगेलवार, आड़े, डॉ. रवी नलवाडे उपस्थित होते.

आजाराला घाबरू नये

डेंग्यू आजाराला घाबरण्याचे काहीही कारण नाही. घर परिसरातील स्वच्छ पाणी उघडे ठेवु नये. परिसरात पाणी साचु देवु नये.

डॉ.जयश्री थोटे