निर्बंध शिथिल होताच नियम धाब्यावर; बाजारात गर्दी, रस्त्यावरही वाहनांचा राबता

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (To break the chain of corona) जिल्ह्यात 8 मे पासून 31 मे पर्यंतच्या कालावधीत टप्प्याटप्याने जिल्हाधिका-यांनी (District Collector) कडक निर्बंधासह लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, मंगळवारपासून त्यातील कडक निर्बंध शिथिल केल्याने (relaxed its strict restrictions) नागरिकांनी कोरोना नियम धाब्यावर बसवित खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी केली.

  वर्धा (Wardha). कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (To break the chain of corona) जिल्ह्यात 8 मे पासून 31 मे पर्यंतच्या कालावधीत टप्प्याटप्याने जिल्हाधिका-यांनी (District Collector) कडक निर्बंधासह लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, मंगळवारपासून त्यातील कडक निर्बंध शिथिल केल्याने (relaxed its strict restrictions) नागरिकांनी कोरोना नियम धाब्यावर बसवित खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी केली. त्यामुळे शहरातील रस्त्यावरही वाहनांचा राबता वाढल्याचे दिसून आले.

  मंगळवारी शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लीबोळातील रस्तेही नागरिकांनी फुलले होते. 8 मे पासून मेडिकल, रुग्णालय वगळता इतर सर्व अत्यावश्यक सेवा कडकडीत बंद होत्या. सदर निर्बंधात शिथिलता देऊन दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिल्यानंतर सकाळपासूनच वर्धेकरांनी बाजारपठेत साहित्य, वस्तू खरेदीसाठी एकच गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. किराणा दुकान, बेकरी, भाजीपाला, पेट्रोलपंप यासह अत्यावश्यक सेवेच्या सर्व दुकानांवर अक्षरशा रांगा लागल्या होत्या.

  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 8 मे पासून लॉकडाऊन जाहीर करून कडक निर्बंध लावले होते. मात्र, मंगळवारी कोरोनाचे नियम पायदळी तुडविण्यात आले. यावेळी कुठल्याही व्यावसायिक व ग्राहकांनी कोरोना नियमांचे पालन केल्याचे दिसून आले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या गर्दीमुळे कोविडचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी सात वाजतापूर्वीच वर्धेकर खरेदीसाठी घराबाहेर पडले. किराणा, भाजीपाला दुकाने, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई पिठाची गिरणी, खाद्यपदार्थांची दुकाने, कोंबडी, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी पहावयास मिळाली.

  कापड, किराणा दुकानावर गर्दी
  शहरातील मुख्य बाजारपेठेसह गल्लीबोळातील कापड व किराणा दुकानांवर सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. काही दुकानात ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, सोशल डिस्टसिंगचे कुठलेही पालन केल्याचे दिसून आले नाही.

  सोशल डिस्टसिंगचा फज्जा
  शहरातील अनेक दुकानांमध्ये तसेच रस्त्यावर, बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचे नागरिकांनी सोशल डिस्टसिंग पाळले नाही. त्यामुळे सर्वच ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.