रब्बी पीक 
रब्बी पीक 

वर्धा (Wardha) (संजय तिगावकर) : खरिपाचा हंगाम संपत आला आहे. ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली होती. त्या शेतक-यांनी रब्बी पिकाच्या नियोजनाला हात घातला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे.

वर्धा (Wardha) (संजय तिगावकर) : खरिपाचा हंगाम संपत आला आहे. ज्या शेतक-यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली होती. त्या शेतक-यांनी रब्बी पिकाच्या नियोजनाला हात घातला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे.

खरिपातील सोयाबीन जवळपास 70 टक्के गेले. झालेल्या उत्पादनातून कुटुंबाचा खर्च,कर्जाचे ओझे, रब्बीचे बियाणे कसे घ्यावे? असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहे. बळीराजाचे कंबरडे मोडले तरी नव्यादमाने रब्बी पिकाच्या नियोजनाला त्याने सुरुवात केली आहे. रब्बी पिकासाठी मुख्यतः हरभरा व गहू पिकाची पेरणी केली जाते. हरभरा पिकाची पेरणी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर कालावधीत करण्यात येते. यंदा पाऊस जास्त पडल्याने शेतात ओलावा भरपूर आहे. ओलिताच्या शेतक-यांसह कोरडवाहू पीक घेणा-या शेतक-यांना सुद्धा यावर्षी हरभरा पिकाची लागवड करण्याची संधी आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची लागवड 1 लाख 37 हजार 266 मध्ये केली होती. वर्धा कृषी विभागाने 93 हजार 145 हेक्टर रब्बी पिकाचे क्षेत्र तयार केले आहे. यापैकी 62 हजार हेक्टरमध्ये हरभरा व उर्वरित क्षेत्रात गहू पिकाची पेरणी शेतकरी करतील, असा अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केला.

हरभरा पिकाच्या बाबतीमध्ये काही शेतकरी स्वतः जवळचे बियाणे वापरतात. या पिकाला खर्च कमी येतो. देवळी, सेलू तरोडा या भागात एकरी दहा ते पंधरा पोते उत्पादन घेणारे शेतकरी सुद्धा आहे. हरभरा पिकाला यावर्षी चार हजार 850 रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे बुडला असला तरी रब्बी हंगामाकडे आशेने पाहत आहे.

रवी शेंडे, व्यवस्थापक, महाबीज, वर्धा आणि राम राठोड, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, वर्धा

तांत्रिक पद्धतीने रब्बी पीक घ्यावे
— यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शेतात ओलावा आहे. रब्बी पिकांमध्ये मर रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ट्रायकोडर्मा सारख्या बुरशीनाशक औषधांचा वापर करूनच पेरणी करायला पाहिजे. लॉकडाऊन काळात कंपन्यांनी आडमुठेपणा दाखवला. आगाऊ रक्कम दिल्याशिवाय बियाणे पाठवतच नाही. त्यामुळे आम्हा शेतक-यांना देताना अडचण निर्माण होत आहे.
—- रवी शेंडे, अध्यक्ष, जिल्हा कृषी व्यावसायिक संघ, वर्धा.

दहा हजार क्विंटल हरभरा बियाण्याचे नियोजन
मागील वर्षी महाबीजने 7 हजार 800 क्विंटल हरभरा बियाणे शेतक-यांना दिले होते. यावर्षी मात्र दहा हजार क्विंटल बियाणे देण्याची तयारी आहे. सध्या बाजारात 6 हजार क्विंटल उपलब्ध केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत राज विजय व फुले विक्रम बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. गहू पिकाचे बियाणे पुढील काही दिवसांत उपलब्ध केले जाईल. शेतक-यांनी उत्पादन क्षमता वाढविण्याकरिता बुरशीजन्य औषधांचा वापर जरूर करावा.
— राम राठोड, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, वर्धा