प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

हिवाळा सुरु असला तरी अधुनमधुन ढगाळी वातावरण व अवकाळी पावसाच्या सरीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरण , पावसाच्या सरी यामुळे रब्बी पिकावरील रोगराई कमी होत नाही. ढगाळी वातावरणामुळे शेतातील उभ्या पिकावर रोगराईचा प्रादूर्भाव वाढता आहे. हरभरा, गहू, तुर भाजीपाला पिकांसह फळबागांवरही विविध कीड रोग आक्रमण करीत आहे.

वर्धा (Wardha).  हिवाळा सुरु असला तरी अधुनमधुन ढगाळी वातावरण व अवकाळी पावसाच्या सरीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरण , पावसाच्या सरी यामुळे रब्बी पिकावरील रोगराई कमी होत नाही. ढगाळी वातावरणामुळे शेतातील उभ्या पिकावर रोगराईचा प्रादूर्भाव वाढता आहे. हरभरा, गहू, तुर भाजीपाला पिकांसह फळबागांवरही विविध कीड रोग आक्रमण करीत आहे.

रब्बी पिकाला थंडीची आवश्यकता असते. थंडीचा जोर वाढला तर कुठल्यातरी भागात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे हवामानात बदल होऊन एकतर ढगाळ वातावरण किंवा पावसाच्या सरी किंवा हवेत उष्णतेचे प्रमाण वाढते.या वातावरणातील बदलामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यामुळेच यावर्षी सततच्या पावसामुळे खरीपातील कापूस व सोयाबीनचे पीक निसर्गाने बळीराजाच्या हातातुन हिरावले आहे.अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टयामुळे गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येते. तसेच पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. या ढगाळ वातवरणाचा परिणाम पिकांवर होणार असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

हरभरा पिकावर मर रोगाने आक्रमण केले आहे. भाजीपाला पिकांनाही या हवामानाचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. हवामानाची स्थिती जर आणखी काही दिवस असेल तर शेतक-यांच्या रब्बी पिकापासूनच्या आशा मावळतील यात शंका नाही. रोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणाकरिता किटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. यामुळे बळीराजाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे.

अवकाळी पाऊस येण्याची शक्यता
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टयामुळे विदर्भात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता हवामाना खात्याने वर्तविली आहे. 14,15,16 डिसेंबर या तीन दिवसात पावसाच्या सरी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. थंडी कमी होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे. 16 डिसेंबर नंतर मात्र तापमान कमी होणार आहे. काही भागात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.